अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
उत्कर्ष विद्यालयातील विद्यार्थिनींनी रक्षाबंधन निमित्त पोलिस बांधवाना बांधल्या राख्या.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू :- श्रीराम प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालयात डॉ. संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून एक अनोखे रक्षाबंधन साजरे केले या मध्ये सेलू शहरातील पोलीस स्थानकात जाऊन पोलीस बांधवाना बाल चिमुकल्याकनी राख्या बांधल्या हे अनोखे रक्षाबंधन करण्यामागचा हेतू म्हणजे सेलू शहरातील शाळकरी मुली तसेच महिला यांच्या सुरक्षितेची संपूर्ण जबाबदारी या पुलिस बांधवानी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे याचाच परिणाम म्हणून सेलू शहर हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाते या पोलीस बांधवानची मुली व महिलांन बद्दल असणारी काळजी ही एका भावप्रमाणे आहे म्हणूनच या वर्षी रक्ताच्या भावासारखाच घराच्या बाहेर काळजी घेणारा भाऊ हा ही तितकाच महत्वाचा आहे म्हणून हा अनोखा उपक्रम करण्याचे उत्कर्ष विद्यालयातील मुलींनी ठरवले होते सदरील कार्यक्रमाला संपूर्ण पोलीस बांधवानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व त्यांनी या पुढेही सुरक्षितेची हमी देऊन आभार मानले या कार्क्रमसाठी उत्कर्ष विद्यालयाच्या सौ सुचिता साबळे, सौ वैशाली परळीकर, सौ सारिका बंडे व इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले.
