अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
माजी नगरसेविका मीनाक्षी काडगी यांना पद्मशाली समाज भूषण पुरस्कार प्रधान
दोन वेळा महानगरपालिकामध्ये प्रतिनिधित्व करणारे पुणे शहर पद्मशाली महिलांमध्ये पहिल्या महिला नगरसेविका होण्याचा मान मिळवणारे अनेक सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेऊन समाजाचे नाव उंचवणारे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी नगरसेविका मीनाक्षी ज्ञानेश्वर काडगी यांना आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते पद्मशाली समाज भूषण पुरस्कार देऊन विशेष गौरवण्यात आला, लोहियानगर येथील सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला,
यावेळी पद्मशाली पंच कमिटीचे अध्यक्ष विनोद जालगी, महिला मंडळाच्या अध्यक्षा वंदना पासकंठी, सामाजिक कार्यकर्ते गणेश शेरला, संजीव मंचे, महेश चलमल, विलास मद्देल, आदि यावेळी उपस्थित होते,
