अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार साठी अर्जाची मागणी
हिंगोली.श्रीहारी अंभोरे पाटील
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित
हिंगोली, दि.05 जुलै रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा भारत सरकारकडून विविध क्षेत्रातील मुलांच्या अपवादात्मक कामगिरीची दखल घेण्यासाठी दिला जातो. गुणवंत तरुणांना सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार सहा श्रेणींमध्ये दिला जातो.
हा पुरस्कार शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा, कला आणि संस्कृती आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान 18 वर्षांखालील मुलांना (15 ऑगस्ट 2025 रोजीपर्यंत) या क्षेत्रात उत्कृष्टता आणि उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो. यामध्ये बालक हा भारतीय नागरिक आणि भारताचा रहिवासी असावा. त्याचे वय निकष 5 ते 18 वर्षे पूर्ण असावे. नामांकनाच्या शेवटच्या तारखेपूर्वी 2 वर्षांच्या आतील कृती/कामगिरी केलेली असावी. कोणतीही व्यक्ती किंवा संस्था नामांकन करू शकते. मुले स्व-नामांकनाद्वारे देखील अर्ज करू शकतात. सर्व नामांकने ही 15 ऑगस्टपर्यंत https://awards.gov.in द्वारे ऑनलाइन सादर करावीत. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड झालेल्या लाभार्थी बालकांना पदक, प्रमाणपत्र, प्रशस्तीपत्र देण्यात येईल. यामध्ये जास्तीत जास्त 25 अर्ज मर्यादा असून, यामध्ये समितीकडून अर्जसंख्या शिथिल केले जाऊ शकते, असे जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाने कळविले आहे
