संघर्ष नायक दिपक केदार यांच्या वाढदिवस निराधार वृद्धासोबत साजरा.
प्रतिनिधी- सारंग महाजन
चिखली -: राजकीय नेते म्हटले कि अनाठाई खर्च ब्यानर बाजी पार्टी व इतर खर्च न करता माझाटीव्ही वाढदिवस समाज उपयोगी कार्यक्रमातून साजरा करण्याचे आव्हान ऑल इंडिया दलित पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक भाई दिपक केदार यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले होते. त्यांच अनुषंगाने चिखली तालुक्याच्या वतीने संघर्ष नायक दिपक केदार याच्या वाढदिवस निमित्त तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात फळ फराळाचं वाटप करून साजरा केला. ऋणानुबंध समाज विकास संस्था रजि. नं: महा 534/एफ-11058 चिखली व्दारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत कायम विनाअनुदानित तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे वयोवृध्द आणि डिपेन्डंट व्यक्तींसाठी निवासी आश्रम गेल्या चार वर्षांपासून सुरु आहे. येथे गरजवंत निराधार आहेत अशा वयोवृध्द व चालते फिरते भिक्षा मागणारे आजोबा-आजी, डिपेन्डंट व्यक्ती इत्यादींसाठी या तुकाराम आश्रय वृध्दाश्रमाची सर्व प्रकरची निःस्वार्थ मोफत सेवा देणे सुरु आहे.
येथील वृद्धाना मायेचा आधार संकेत जाधव यांच्या नेतृत्वात संघर्ष नायक भाई दिपक केदार यांच्या वाढदिवसानिमित्त तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात फळ व फराळ वाटप करून साजरा साजरा केला. यावेळी पँथर संकेत जाधव, योगेश जाधव, शुभम अंभोरे, शुभम जाधव, संदेश डोंगरदिवे, आवेश शेख, प्रफुल्ल गवई, राजरत्न निकाळजे, रोहन देव्हरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच तुकाराम आश्रय वृध्दाश्रम, भोकर येथील वृद्धाच्या सेवे करिता दात्यानी समोर येऊन भरीव मदत करावी असे आवाहन भरत जोगदंडे यांनी केले तर कुठेही निराधार बेघर मुलं मुली वा इतर नातेवाईक असून सुद्धा त्यांचा सांभाळत नसतील अश्या वृद्धानी 8855850378 या नंबर ला संपर्क करावा असे आवाहन वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी केले आहे.
