अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
पुणे लोहगाव कलवड वस्ती मधील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी छप्परबंद क्रांती समाज संघटनेच्या वतीने आंदोलन,
पाणीपुरवठा नियमित वेळेनुसार करावा, नागरिकांशी सुसंवाद साधावा, दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अनेक दिवसापासून रखडलेल्या पाणीपुरवठा प्रश्न तत्काळ सोडावा अशी घोषणा देत छप्परबंद क्रांती समाज संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष रफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव पार्क येथील बंड गार्डन पाणीपुरवठा विभागासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले,
पुणे लोहगाव कलवड वस्तीतील परिसरातील नागरिक गेल्या अनेक दिवसापासून पाणी पुरवठ्याच्या गंभीर समस्येला सामोरे जात आहे पाणीपुरवठा विभागाचे अकार्यक्षम धोरण आणि निष्काळजीपणामुळे त्या ठिकाणी नागरिकांना रात्री तीन ते चार या वेळेत पाणी सोडले जात आहे त्यामुळे नागरिकांची झोप मोड होते वृद्ध महिलांना त्रास होतो आणि सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड नाराजी निर्माण होते, या अन्यायकारक परिस्थितीच्या विरोधात नागरिकांना समान पाणीपुरवठा होण्याकरिता यावेळी बंडगार्डन पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, यावेळी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
