अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
गाना गाओ जिंदगी सजाओ’ कार्यक्रमाला रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद
चिखली येथिल पत्रकार सिद्धार्थ धंदरे यांनी जिंकली प्रेक्षक रसिकांची मने
प्रतिनिधी -सारंग महाजन
गाना गाओ जिंदगी सजाओ फेसबुक लाईव्ह शो ला नऊ वर्ष पूर्ण होऊन शोच्या माध्यमातून १००० भाग यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल स्थानिक नांदुरा रोडवरील आसरा चौपाटीच्या प्रशस्त हॉलमध्ये रविवार दिनांक ३ ऑगस्ट २५ रोजी संगीताचा भन्नाट कार्यक्रम घेण्यात आला. या बहारदार गाण्यांच्या कार्यक्रमात शहरासह परिसरातील संगीत प्रेमी सहभागी झाले होते. यामधील चिखली शहरातील प्रसिद्ध गायक तथा पत्रकार सिद्धार्थ धंदरे यांनी सहभागी होऊन आपल्या गाण्याला योग्य न्याय दिला. कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह राजपूत, शहर काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल ठाकरे पाटील, शाहीर सुरेशसिंह राजपूत, शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष किशोरआप्पा भोसले, शंभू शर्मा, स्वप्नील महर्षी, टाक सर,, शेख जुलकरसह पत्रकार बांधवांनी हजेरी लावली.
असं म्हणतात संगीत हे सर्वांनी ऐकले पाहिजे कारण ,संगीत हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. संगीत ऐकल्याने आपले मन अगदी प्रसन्न होते. संगीत माणसाला मानसिक स्वास्थ प्रदान करण्याचे माध्यम आहे. याचाच अंगीकार करून आपल्या गीताच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे चिखली येथील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे राजे संभाजी नगर चिखली शाखा व्यवस्थापक पत्रकार सिद्धार्थ धंदरे यांनी खामगाव येथे आयोजित गाना गाओ जिंदगी सजाओ या कार्यक्रमात सहभागी होऊन रसिकांची मने जिंकली. त्यांनी दोस्ती या हिंदी चित्रपटातील मोहम्मद रफी यांचे चाहूंगा मै तुझे सांज सवेरे हे बहारदार गीत गायले.
याअगोदरही सिद्धार्थ धंदरे यांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली नावलौकीकता मिळवली आहे. संगीताशी त्यांचा असलेला प्रामाणिकपणा आणि काळजात घर करून जाणारा त्यांचा आवाज रसिकांना भुरळ घातल्याशिवाय राहत नाही. खरे म्हणजे शाखा व्यवस्थापक हि महत्वाची जबाबदारी आणि संसारगाडा सांभाळत कला जोपासण्याचे काम ते गेल्या २० वर्षांपासून अखंड करत आहेत. त्यांची नव्वदच्या दशकातील गाणी, मराठी भावगीत अगदी रसिकांच्या मनात खोलवर रुजून जातात. खामगाव येथील त्यांच्या या बहारदार गीताबद्दल त्यांचे मित्र मंडळी, वरिष्ठ आणि कनिष्ठ मंडळींकडून तोंड भरून कौतुकांचा वर्षाव होत आहे.
