अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंची बदली, तर ओंमकार पवार नाशिकचे नवे सीईओ …!!
अनुजा कारखेले-देवरे (नाशिक जिल्हा ) प्रतिनिधी
राज्यांत राजकीय वातावरण तापले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच राज्यांत महायुती सरकारकडूंन प्रशासनात देखील फेरबदल होत असताना दिसून येत आहे. महायुतीच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने मंगळवारी पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून… यामध्ये ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे यापूर्वी असंघटित कामगार विभाग विकास आयुक्त म्हणून ते काम पाहत होते. आता दिव्यांग कल्याण विभागातील सचिव पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. तुकाराम मुंढे नेहमीच बदलीच्या चर्चेत असतात त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दी मध्ये 20 वर्षात 24 व्या बदलीचा आदेश जारी करण्यात आला आहे. आता राज्यांच्या सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या बदलीचा आदेश काढला आहे. तत्काळ प्रभावाने नव्या नियुक्तीच्या ठिकाणी कार्यभार स्वीकारण्याची सूचना देखील करण्यात आली आहे. तर नाशिकचे नवे सीईओ म्हणून ओमकार पवार यांची नियुक्ती झाली आहे. ओमकार पवार हे ( 2022 ) च्या तुकडीतील (आयएएस अधिकारी ) नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची जालना जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यापासून मुख्य कार्यकारी अधिकारी पद चांगलेच रिक्त होते आणि याच पदावर जवळपास तीन आयएएस अधिकाऱ्यांची नावे चांगलीच फिल्डवर दिसून येत होती. आणि याच पसंतीला मुख्यमंत्र्यांनी अखेर ओंमकार पवार या आयएएस अधिकाऱ्याला संधी देण्यात आली आहे.*
