अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
वरखेडी नगरीत आहिरे परिवारातर्फे कानबाई मातेची भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न
मोहन ब्रँड चे संचालक व मालक मा .मोहन दादा पाटील ,(गिरड,)18 पुरस्काराने सन्मानित झालेले मास्टर राम शाम संगिता PHD केलेले मोहन ब्रँड टिम याचे वरखेडी नगरीत ग्रामस्थ मंडळी कडुन मोठ्या उत्साहात सत्कार
जळगाव जिल्हा प्रतिनिधी| समाधान पाटील
एरंडोल तालुक्यातील वरखेडी नगरीत 4 ऑगस्ट रोजी कानबाई मातेची मोठ्या उत्साहात सोहळ्यानिमित्त वरखेडी नगरीत भव्य मिरवणूक काढण्यात आली असताना अभुतपुर्व प्रतिसाद वरखेडी नगरीतील ग्रामस्थ मंडळी व अहिरे परिवार लाभला. व कानबाई मातेची नामाचा गजर करत शेकडो वरखेडी नगरीतील ग्रामस्थ मंडळींनी रामलाल रामकृष्ण पाटील यांच्या घरापासून सकाळी आठ ते साडे आठ यावेळेत कानबाई मातेची प्रतिमेचे पूजन ग्रामस्थ व अहिरे परिवार व भक्तगणांकडून करण्यात आली, त्यानंतर नऊ ते दहा पर्यंत कानबाई मातेची गितांचा व
गजर, दहा वाजता भगव्या गावातु मोहन ब्रँड यांच्या गजरसह पुर्ण वरखेडी नगरीत मोठ्या संख्येने गावातील भाविक भक्तांनी कानबाई मातेची मुर्ती डोक्यावर घेऊन सजवून मोठ्या थाटामाटात संपूर्ण गावामध्ये मोहन ब्रँड च्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. कानबाई मातेची मोठ्या उत्साहात घोषणा देत लहान थोर मंडळी मोठ्या उत्साहात सहभागी झाले.
याप्रसंगी गावातील सर्व महिला मंडळ मोठ्या संख्येने कानबाई मातेच्या उत्साहा मध्ये सहभागी झाले सदर कार्यक्रमांत वरखेडी नगरीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
