माजी नगराध्यक्ष यांनी दिला रा.काँ. पक्षाचा सक्रिय सदस्य पदाचा राजीनामा.
यावल दि.३ ( सुरेश पाटील )
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सक्रिय सदस्य पदाचा राजीनामा माजी प्र.नगराध्यक्ष यांनी यावल तालुका अध्यक्ष यांच्याकडे दिल्याने राजकारणात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल नगरपरिषद माजी प्र. नगराध्यक्ष तथा श्री महर्षी शहर विकास आघाडी गटनेता राकेश मुरलीधर कोलते यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा यावल तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांच्याकडे रविवार दि. ३ ऑगस्ट २०२५ दिल्याने तालुक्यात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गळती सुरू झाली असल्याची चर्चा आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की लवकरच नगरपरिषद जि.प.पं.समिती इत्यादी निवडणुका होणार असल्याने राजकीय पक्षांमध्ये जोरदार घडामोडी, हालचाली सुरू झाल्या आहे विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून राजकारणात सक्रिय अशा हालचाली सुरू झाल्या याच उद्देशातून यावल नगरपरिषदेचे माजी प्र.नगराध्यक्ष राकेश कोलते यांचा यावल शहरातील सर्व प्रभागात मोठा जनसंपर्क असणारे राकेश मुरलीधर कोलते यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाचे तालुकाध्यक्ष यांच्याकडे दिला.
राकेश कोलते यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला राम राम ठोकल्याने तसेच राकेश कोलते यांची यावल शहरातील सामाजिक,राजकीय घट्ट पकड लक्षात घेता त्यांना आता भाजप किंवा भा.रा. काँ. किंवा सत्ताधारी पक्षाच्या कोणत्या गटातील कोणता पक्ष आपल्याकडे आकर्षित करणार याकडे संपूर्ण यावल तालुक्यातील राजकारणाचे लक्ष लागून आहे.
