अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
परभणीत पोलिस अत्याचार प्रकरण: अशोक घोरबांड यांच्यावर FIR दाखल, कडक कारवाईची मागणी
प्रतिनिधी: गोपाळ भालेराव
परभणी :परभणी जिल्ह्यातील नवामोंढा पोलिस ठाण्यात पोलिस कस्टडीत मृत्यूमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. या प्रकरणात पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर अखेर FIR दाखल करण्यात आला असून त्यांना निलंबितही करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या स्पष्ट निर्देशांनंतर ही कारवाई झाली.
पोस्टमॉर्टेम अहवालात मृत्यूचे कारण पोलिसी मारहाणीमुळे झाल्याचा उल्लेख आल्याने संपूर्ण पोलिस यंत्रणा धोक्क्यात आली आहे. मृतकाच्या कुटुंबीयांनी न्यायालयात याचिका दाखल करत चौकशीची मागणी केली होती.
