अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
आर्य समाज धर्माबाद च्या वतीने पोलिस निरीक्षक श्री सदाशिव भडीकर यांचे स्वागत
संतोष सज्जन तालुका प्रतिनिधी धर्माबाद
धर्माबाद दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी धर्माबाद पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री सदाशिव भडीकर साहेबांनी पोलिस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनानुसार धर्माबाद मधील अवैध दारू शिंदी विक्री बंद केल्यामुळे अनेक किशोरवयीन मुल व्यसनाधीन होण्यापासून वाचले त्या प्रित्यर्थ आर्य समाज धर्माबाद तर्फे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन नवनियुक्त पोलीस निरीक्षकांचे सत्कार करण्यात आला व त्यांना अशाच प्रकारे धर्माबाद शहरे व्यसनापासून मुक्त ठेवण्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या शुभेच्छा स्वीकारतांना सदाशिव भडीकर म्हणाले अवैध धंदे करणाऱ्यास सुधारण्याची संधी देण्यात येईल व त्याला छोटामोठा व्यवसाय करण्यासाठी संधी उपलब्ध करून देऊन त्यांना अवैध मार्गापासून दूर करून चांगल्या मार्गाकडे वळवून त्यांचे जीवन चांगल्या प्रकारे जगण्यासारखे त्यांच्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अशी ग्वाही भडीकर यांनी आर्य समाज्यांच्या बांधवांना दिली धर्माबाद तालुक्यातील सर्व जनतेमध्ये सलोखा राखत सर्व जनतेच्या भल्यासाठी अहोरात्र कार्य करणार शांतता सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आमच्या सर्व पुलिस फोर्स चे सहकार्य असेल असे म्हणत आलेल्या सर्व समाजबांधवाचे त्यांनी आभार व्यक्त केले कोणतीही काही समस्या असल्यास बिनधास्त पणे पोलीस स्टेशनला यायला सर्वसाधारण व्यक्तीला पण भीती वाटणार नाही अशी पद्धत अवलंबणार असे म्हणाले यावेळेस उपस्थित धर्माबाद आर्य समाजाचे प्रधान श्री सुरेश जी चिंतावार मंत्री श्री सागर चिद्रावार कोषाध्यक्ष श्री सुरेश जी गंजेवार, उपमंत्री श्री श्रीनिवास वंगल,पतंजली योग समितीचे धर्माबाद चे अध्यक्ष पंडित अनिल जी आर्य भारत स्वाभिमान ट्रस्ट धर्माबादचे अध्यक्ष श्री प्राध्यापक मारुती ईजळकर सर, पदाधिकारी सहभागी होते
