अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
धर्माबाद बस स्थानकाचे यवतमाळच्या पथकाकडून मूल्यांकन
प्रतिनिधी गजानन वाघमारे धर्माबाद शहर
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ ,सुंदर बसस्थानक अभियान २०२५ अंतर्गत जिल्हा यवतमाळ विभागाच्या पथकाने धर्माबाद येथील बसस्थानकाचे मूल्यांकन केले आहे. अभियान पथक प्रमुख म्हणून विभाग नियंत्रक यवतमाळ येथील मा. कच्छवे अमृतराव हे होते.धर्माबाद येथील बस स्थानकास गेल्या वर्षी २०२४ मध्ये विभागातून द्वितीय क्रमांक पटकावला होता. दर तीन महिन्याला होणाऱ्या मूल्यांकन मध्ये दि.३१ जुलै २०२५ रोजी दुसरा मूल्यांकन दिवस होता. बिलोली बस आगार प्रमुख नरसिंग निम्मनवाड यांनी अभियान पथकास धर्माबाद बस स्थानकाची पाहणी करून पंचा समक्ष मूल्यांकन केले आहे. यावेळी यवतमाळ येथील विभागीय सांख्यिकी अधिकारी संदीप कोडापे, वसंतराव अनमोड वाहतूक नियंत्रक धर्माबाद, रमेश वाघमारे वाहतूक नियंत्रक धर्माबाद, पंच म्हणून जी. पी. मिसाळे मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष नांदेड, जी.के .वाघमारे पत्रकार यांनी मूल्यांकन केले आहे. यावेळी मनोज जोगदंड, रत्नपाल मोरे, अजित मेडेवार, शिवदास वारले वाहक, एच. एस .कांबळे चालक यांची उपस्थिती होती.
धर्माबाद येथील बसस्थानकाची स्वच्छता, परिसर व गार्डन पाहून पथकाने समाधान व्यक्त केले आहे.
