अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
१ऑगस्ट २०२५ रोजी
प्रतिनिधी गोपाळ भालेराव
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेद्रुज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष श्री. दिनेश लिंबाजी गोतारणे यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन युवक आघाडीचे श्री विनायक भालेराव ( युवक महासचिव ), साहिल वाघमारे ( युवाक उपाध्यक्ष ), आदेश भालेराव ( युवक कार्याध्यक्ष ), शुभम भालेराव ( युवक सहसचिव ), कमलेश गोतारणे ( भीमयोद्ध प्रतिष्ठान अध्यक्ष) यांनी शालेय साहित्य आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला . तसेच या कार्यक्रमाला वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रांत आल्हाट साहेब, खेड तालुका कार्याध्यक्ष श्री. दत्ताभाऊ कांबळे आणि वंचित बहुजन आघाडीचे तालुका युवक अध्यक्ष दत्ताभाऊ सोनवणे, संजय दुधवडे ( संघटक ), गंगावणे साहेब, हाटाळे साहेब व हेद्रुज ग्रामस्थ व संपूर्ण शिक्षक वृधं इत्यादी मान्यवर सदस्य उपस्थित होते.
