अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सरदार वल्लभ भाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये श्री अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी.
प्रतिनिधी यावल दि.१ ( सुरेश पाटील )
यावल येथील सरदार वल्लभभाई इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये लोकशाहीर श्री अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
आज दि.१ऑगस्ट २०२५ रोजी सरदार वल्लभभाई इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.शाळेचे अध्यक्ष डॉ.प्रदीप माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शीला तायडे मॅडम यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले कार्यक्रमामध्ये इयत्ता चौथी ची विद्यार्थिनी कृतिका पाटील हिने भाषण दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी राजपूर्वा फेगडे हिने केले कार्यक्रमासाठी प्रशांत फेगडे सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
