अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अटकळी ग्रामपंचायत कार्यालय येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
रामतीर्थ सर्कल प्रतिनिधी गणेश कदम
बिलोली तालुक्यातील मौजे अटकळी ग्रामपंचायत कार्यालय येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.जिवनाचे चित्रण आपल्या साहित्यातून जगासमोर मांडनारे सामाजिक बांधिलकी माननारे आणि समाज परिवर्तनासाठी लेखणीचे शस्त्र हाती घेऊन उपेक्षितांच्या जगण्याचे बयान वास्तव अधोरेखित करनारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त औचित्य साधून सकाळी ठिक ९ वाजता पहिल्या प्रथम प्रतिमेचे दिपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण (सरपंच प्रतिनीधी) उत्तम बत्तलवाड ग्रामविकास अधिकारी डि.आर हंबीरे शिवाजी गायकवाड,पि.जि.भालेराव परमेश्वर गायकवाड अमोल शेरे सुधीर वाघमारे संजय गायकवाड आदि.साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी रंगराव गायकवाड अमोल बि शेरे बालाजी भालेराव माधव गायकवाड राम जाधव बालाजी गायकवाड मारोती गायकवाड नागनाथ पांचाळ नारायण पांचाळ सलीम शेख गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.
