अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
भद्रावती तहसील कार्यालयात महसूल सप्ताहाचा शुभारंभ
आमदार देवतळे यांच्या हस्ते उद्घाटन
अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती :- राज्यात १ ऑगस्ट २०२५ रोजी ‘महसूल दिन’ आणि १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्याच्या शासन निर्णयानुसार भद्रावती तहसील कार्यालयात दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मा. श्री. करणजी देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार श्री. राजेश भोंडारकर होते.
महसूल सप्ताहामध्ये होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती या वेळी देण्यात आली. मुख्य कार्यक्रमात महसूल विभागाचे मंडळ अधिकारी श्री. अनिल दडमल, श्री. समीर वाठोकर, सहाय्यक महसूल अधिकारी श्री. गजानन बोबडे, श्रीमती श्रीमंती रामटेके, ग्राम महसूल अधिकारी श्री. खुशाल मस्के, विनोद चिकटे, रवि तल्लवार, श्रीकांत गिरे, प्रतीक्षा लोखंडे, अमर श्रीरामे, श्रीरामे, सिध्देश पडोळेवार, श्रीपाई श्रीमती शांताबाई मानुसमारे, महसूल सेवक श्री. सुरज शेंड आदींना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अनिल श्रुगारे (ग्राम महसूल अधिकारी) यांनी केले, तर आभार तहसीलदार श्री. मनोज आकनुरवार यांनी मानले.
