हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभेतील गिरगाव जिल्हा परिषद चा बुलंद आवाज भाजपा हिंगोली
प्रतिनिधी श्रीहरी अंभोरे पाटील
राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे त्यामुळे राज्यातील राजकारण संपूर्ण ढवळुन निघाल्याचे चित्र दिसुन येत असल्याचे पाहायला मिळत आहे आशाच घडामोडीला मोठा वेग हिंगोली जिल्ह्यात दिसुन येताना पाहायला मिळत आहे कालच अनेक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी नगरसेवक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती घेतले असतानाच आज मुंबई येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने या पक्षाचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी जिल्हा परिषद सदस्य व विधानसभेची तोफ म्हणून ओळख असलेले रवी पाटील नादरे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाला सोडचिट्टी देत आज मुंबई येथे जाहीर पक्ष प्रवेश करत भाजपाचे कमळ हाती घेतले आहे मुंबई येथील पक्ष कार्यालय या ठिकाणी पक्षप्रवेश झाला आहे यांचा पक्षप्रवेश महाराष्ट् प्रदेशाध्यक्ष माननीय श्री.रवींद्र चव्हाण साहेब तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय आदरणीय श्री.अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते तसेच हिंगोली भाजपा, जिल्हाध्यक्ष माजी आमदार श्री.गजाननराव घुगे व वसमत विधानसभेच्या नेत्या सौ.प्रीती ताई जयस्वाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जाहीर पक्षप्रवेश झाला, त्यावेळी संतोष भाऊ हादवे व हिंगोली जिल्ह्यातील इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
