खराडी पोलिसांची कौशल्य पूर्ण कामगिरी
प्रतिनिधी गोपाळ भालेराव
दिनांक -३०/०७/२०२५
गहाळ झालेले १५ मोबाईल ३ लाख ८३ हजार रु. किं. चे नागरिकांना केले परत.
खराडी पोलीसांनी गहाळ झालेले ३ लाख ८३ हजार किंमतीचे एकुण १५ मोबाईल नागरिकांना केले परत खराडी पोलीस ठाणे हददीतील राहणारे रहिवासी यांनी त्यांचे मोबाईल गहाळ झाल्याबाबतच्या तक्रारी खराडी पोलीस स्टेशनला दिल्या होत्या.
खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय चव्हाण यांनी गहाळ मोबाईल फोनचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व आदेशान्वये पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. विश्वजीत जगताप, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक श्री. राहुल कोळपे व तपास पथकाचे मोबाइलचे तांत्रिक विश्लेषणाचे कामकाज करणारे पोलीस अंमलदार श्री. सुरज जाधव, सायबर पथकातील पोलीस उप निरीक्षक श्रीमती माधुरी बिडवे व सायबर तपास पथक अंमलदार यांनी तपास हाती घेतला होता. त्यानुसार खराडी पोलीस ठाण्यात दाखल गहाळ मधील मोबाईल फोनचे तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस ठाणे हद्दीतील, तसेच इतर जिल्हयातील नांदेड, सोलापुर, अहिल्यानगर, तसेच उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार या राज्यातून शोध घेवून एकुण ३ लाख ८३ हजार किंमतीचे वेगवेगळया कंपनीचे एकुण १५ मोबाईल फोनचा शोध घेवुन ते प्राप्त करण्यात तपास पथक व सायबर पथकास यश प्राप्त झाले असुन सदर फोन नागरीकांना परत करण्यात आले आहेत. नागरीकांना त्यांचे मोबाईल परत मिळाल्यामुळे त्यांनी खराडी पोलीस स्टेशनचे कौतुक करुन आभार मानले.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री मनोज पाटील मा. पोलीस उप-आयुक्त, परि ४ श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग-श्रीमती प्रांजली सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय चव्हाण, खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री विश्वजीत जगताप, सपोनि रविंद्र गोडसे, पोउनि राहुल कोळपे, तपास पथकातील पोलीस अंमलदार महेश नानेकर, सुरेंद्र साबळे, श्रीकांत शेंडे, वसीम सय्यद, सुरज जाधव, श्रीकांत कोद्रे, जयवंत श्रीरामे, विलारा केदारी, सायबर तपास पथकातील महिला पोलीरा अंमलदार श्रीमती प्रतिभा पवार यांनी केली.
