अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अल्ताफ तडवी यांची जळगाव जिल्हा युवा अध्यक्षपदी निवड उत्तर महाराष्ट्र महानिरीक्षक रोनक तडवी व युवा जिल्हाध्यक्ष मुरात तडवी यांच्या हस्ते नियुक्ती
प्रतिनिधी समाधान पाटील जळगाव
जळगाव – अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या जळगाव जिल्हा युवा अध्यक्षपदी अल्ताफ तडवी यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली. ही नियुक्ती उत्तर महाराष्ट्र महानिरीक्षक रोनक तडवी तसेच युवा जिल्हाध्यक्ष मुरात तडवी यांच्या हस्ते करण्यात आली.
अल्ताफ तडवी हे गेल्या काही वर्षांपासून आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत असून, युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत परिषदेने त्यांच्यावर विश्वास ठेवून ही जबाबदारी सोपवली आहे.
नियुक्तीनंतर अल्ताफ तडवी यांनी सांगितले की, “आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. युवकांना संघटित करून शिक्षण, रोजगार आणि हक्कांसाठी काम करणार आहे.”
