शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागणीला यश
प्रतिनिधी मुकुंद मोरे
बीडीडी चाळवासियांना ज्या घराच्या स्वप्नपूर्तीचे वेध लागलेयत, तेच वेध एक लोकप्रतिनिधी म्हणून युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांना लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज पुनर्वसन प्रकल्पाला भेट दिली
हक्काच्या घराचं स्वप्न पूर्णत्वास येत आहे. लवकरात लवकर बीडीडीवासियांना त्यांच्या घराच्या चाव्या मिळाव्यात, ह्याच गोष्टीचा आता पाठपुरावा सुरु आहे.
आजच्या ह्या प्रकल्पाच्या पाहणी दरम्यान शिवसेना नेते, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, शिवसेना युवासेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, आमदार अजय चौधरी, आमदार अनंत नर, आमदार हारून खान, आमदार संजय पोतनीस, आमदार महेश सावंत, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संजय कदम उपस्थित होते.अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मुकुंद मोरे!
