यवत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना; नागरिक संतप्त गावात तणावाचे वातावरण
प्रतिनिधी गणेश महाडिक
दि.२६ रोजी दौंड तालुक्यातील यवत स्टेशन परिसरातील निळकंठेश्वर महादेव मंदिरात स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मुस्लिम युवकाने तोडफोड करून विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना अतिशय निंदनीय असून भाविकांच्या अस्मितेला धक्का बसला आहे. रात्री उशिरा ही घटना घडली. या घटनेने सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेल्या या कृत्याचा गावात सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.या घटनेचा निषेध म्हणून गावातील दुकाने व्यवसाय कडकडीत बंद ठेवण्यात आले. सकल हिंदू समाजाच्या वतीने ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरासमोर निषेध मोर्चा काढण्यात आला. यामध्ये आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.यवत पोलिसांकडून आरोपी निष्पन्न झाला असून त्यावर भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३२४(३),१९६,२९८ प्रमाणे गुन्हे दाखल केले असून त्याला लवकरात लवकर अटक करू अशी ग्वाही पोलिस उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांनी दिली. दिवसभरात आरोपीला अटक झाली नसल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी होती. संध्याकाळी ५ वाजता काळभैरवनाथ मंदिरासमोर निषेध मोर्चा आयोजित केला होता या मोर्चाला लाखों हिंदूंनी उपस्थिती दर्शवली होती.यामध्ये बजरंग दलाचे तसेच गोरक्षक दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. हभप दिपक महाराज मोटे, सूरज चोरगे, प्रशांत शिवणकर, रसिकाताई वरुडकर सणस, शितल दोरगे, अक्षय कांचन,अरविंद दोरगे, उत्तम गायकवाड,श्रीपती दोरगे, डॉ शाम कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांना संबोधित केले. संतप्त गावकऱ्यांकडून “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले आणि मोर्चा मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनकडे वळवला आणि निवेदन देण्यात आले.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता यवत पोलिसांकडून गावात दिवसभर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी गावकऱ्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले व अशा विकृतीच्या कृत्याला कधीही पाठीशी न घालता लवकर अटक केली जाईल असे आश्वासन दिले.
