अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
काळजी नको, बेपत्ता महिला, मुलींच्या शोधासाठी आता पोलीस ठाण्यात स्वतंत्र मिसिंग सेल सुरू होणार:-
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा निर्णय
कलावती गवळी ( मुंबई ) प्रतिनिधी
बेपत्ता झालेल्या महिला आणि मुलींचा शोध घेण्यासाठी राज्यांतील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये आता स्वतंत्र मिसिंग सेल सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार शहरांतील सर्वच पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग सेल सुरू होणार आहे. यामुळे बेपत्ता मुली आणि महिलांचा शोध घेण्याचे काम चांगलेच गतिमान होईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. (सर्व पोलीस ठाण्यांत सेल…) सध्या महिला आणि मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांचा वेळात शोध घेता यावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पावसाळी अधिवेशनात बोलताना राज्यांतील सर्व पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र मिसिंग सेल सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार लवकरच शहरांत याची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे फिर्यादी वेळेत दाखल करण्यास मदत होईल, (प्रमुखपदी महिला अधिकारी नियुक्ती ) मिसिंग सीलच्या प्रमुखपदी पोलीस ठाण्यातील महिला अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे. त्यामुळे महिलांना तक्रार देणे, जबाब नोंदवणे सोयीचे ठरणार आहे. दाखल झालेल्या फिर्यादी आणि तपास याचा आढावा दर 2 महिन्यांनी वरिष्ठांकडून घेतला जाणार आहे असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यांतील बेपत्ता महिला आणि मुलींच्या आकडेवारीनुसार सुमारे 70 टक्के बेपत्तांचा शोध लागतो. मात्र 30 टक्के महिलांनी मुलींचा शोध लागत नाही.
