एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सीआरपीएफ जवान प्रशिक्षण पूर्ण करून परतल्याने आदमपूरात जंगी स्वागत

सीआरपीएफ जवान प्रशिक्षण पूर्ण करून परतल्याने आदमपूरात जंगी स्वागत

आंनद करूडवाडे
नांदेड़ ग्रामीण प्रतिनिधि बिलोली

 

देगलूर तालुक्यातील ग्राम तमलूर येथील मूळचा रहिवासी सध्या वास्तव्यास मौजे आदमपूर, (ता.बिलोली) येथे आपल्या आजी अजोबांकडे असणाऱ्या शेख रियाज रज्जाकसाब या होतकरू तरूणाची केंद्रीय राखीव पोलीस दलातील ट्रेड्समन पदी सन २०२३ सालातील परीक्षेतून थेट निवड झाली होती. सदरील पदाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून योगायोग सीआरपीएफ दलाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत रविवार दि.२७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता त्याचे गावात आगमन होताच गावकऱ्यांकडून फटाके फोडून जंगी सत्कार करीत स्वागत करण्यात आले. तद्नंतर वाजत गाजत गाव परिसरातून मिरवणूक काढण्यात आली.शेख रियाज लहानपणापासूनच आपल्या आदमपूर येथील आजी अजोबांकडे शिकायला होता. तमलूर येथील आई गृहिणी सौ. रिजवानाबी शेख व वडील रज्जाकसाब शेख यांचे हे सुपूत्र होत. कुटुंबात आई-वडील दोन भाऊ व एक बहीण अशी भावंड आहेत. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा, आदमपूर, महाळप्पा पटने विद्यालय, उच्च माध्यमिक सौ. मंजुळाबाई विद्यालय, पुढे पदवीचे शिक्षण नाशिक मुक्त विद्यापीठ अंतर्गत जनता महाविद्यालय नायगांव येथे झाले.शेख रियाज कसाब
नागपूर येथील केंद्रीय राखीव पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनीतून त्याचे ट्रेड्समन पदाचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. सदरील आगमन समारंभास जामा मस्जिदचे अध्यक्ष अहेमदसाब पठाण, उपाध्यक्ष आमिरसाब शेख, मस्जिद हाफिज सय्यद आदम, आदमपूर सरपंच प्रतिनिधी कपिल भुसावळे, उपसरपंच शंकरराव मालीपाटील, माजी सरपंच प्रभाकर पेंटे, अरविंद पेंटे, अंबादास शिनगारे, माजी बँकर फक्रूशा मदार, कवी, गीतकार जाफर आदमपूरकर, भाजपा बिलोली पूर्व मंडळ अध्यक्ष मारोती राहिरे, महेबुब शेख, शेखफरीदशेख, आरिफ शेख, बँक सहाय्यक महमदरफी मदार, मारोती कोलमवार, शिवाजी हांद्रे, पप्पू शेख, अफसर शेख, संपत भुसावळे, गोवर्धन हालबुर्गे, राम हालबुर्गे,शिवाजी हालबुर्गे, नितीन हालबुर्गे, शिवा मठपती, कचरू भुरे, प्रतिष्ठित गावकरी, गाव पदाधिकारी, पञकार, मिञ परिवारासह आदमपूर, तमलूर, मुतन्याळ, थडीसावळी, गळेगांव आदि परिसरातील देशप्रेमी नागरिकांची उल्लेखनीय उपस्थिती होती.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link