अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
कै: रामचंद्र बापूपुरी पुरीगोसावी ( तात्या ) पुरीगोसावी कुटुंबाचे आधारस्तंभ, प्रमुख म्हणून होती ओळख…!!
संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी. (सातारा जिल्हा)
सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावचे आणि सातारा करंजे भैरवनाथाच्या नगरीतील वास्तव्यास असणारे करंजखोप ( ता.कोरेगांव ) येथील कै: रामचंद्र बापूपुरी पुरीगोसावी ( उर्फ तात्या ) यांचे गेल्या गतवर्षी ऐंन दिवाळीमध्ये हृदयविकारांच्या तीव्र धक्क्यांने निधन झाले, तात्यांच्या जाण्यामुळे पुरीगोसावी कुटुंबाला तसेच आपल्या प्रवासांतून कमावलेला जनसंपर्काना देखील मोठा धक्का बसला, तात्यांबद्दल बोलायचे झाले तर शब्द कमीच पडतील असं त्यांचं नेतृत्व व्यक्तिमत्व होतं, आमच्या कुटुंबाच्या खंबीरपणे नेहमीच ते उभे राहत होते, आणि त्यांच्यामुळे आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना समजून घेवुन कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात नेहमीच प्रयत्नशील राहिले, त्यामुळे तात्यांचे कुटुंबात एक आधारस्तंभ आणि प्रमुख म्हणून त्यांना चांगलेच ओळखले जात होते. तात्या हे आपल्या पती सुना नातवंड मुलांसमवेत गेल्या काही वर्षापासून सातारा करंजे या ठिकाणी वास्तव्यास होते, तुळजाभवानी आई माता,मांढरची काळुबाई अशा धार्मिक जागरण गोंधळ या कार्यक्रमामुळे तात्यांचा दांडगा जनसंपर्क होता. त्यांनी आपल्या प्रवासामध्ये पैसा नाही पण माणसं कमावली होती. आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेवुन त्यांनी सातारा जिल्ह्यासह मुंबई कोल्हापूर विदर्भ मराठवाडा अशा ठिकाणी जागरण गोंधळाचे कार्यक्रम पार पाडले होते. त्यामुळे तात्यांना चांगलेच ओळखले जात होते. पण तात्यांच्या निधनाची बातमी मात्र वाऱ्यासारखी पसरली होती. पण कोणाचाच विश्वांस बसत नव्हता. पण मोबाईल वरचे स्टेटस पाहिल्यानंतर मात्र सर्वांना धक्का बसला होता. स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की एक आमच्या आधारस्तंभ आणि प्रमुख आणि मला कधी संभाजी तर कधी साहेब म्हणून ( तात्यांचा ) आवाज कायम होता. असा वाजता मला गेल्या वर्षभरापासून नव्हे तर आता असा आवाज पुन्हा नाही..! मला वडील नसल्यामुळे तात्यांचे माझ्यावर खूप प्रेम होते. माझ्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी मला कधीच वडिलांची आठवण भासु दिली नाही..! माझ्याबद्दल ते सर्वांनाच अभिमानाने सांगत होते. की आमचा पुतण्या पत्रकार आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बरोबर त्याची चांगलीच ओळख आहे. असे तात्या नेहमीच आपल्या सोबतच्या लोकांना सांगत असायचे, पण आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी तात्यांचा शब्द कधीच पडू दिला नाही, तात्या म्हणतील तीच पूर्वदिशा आमच्या कुटुंबामध्ये काय होती, खरंच देवाची चुकी झाली की, आमची चुकी झाली हेच समजलं नाही, आणि तात्या स्वतः देवाची सेवा करीत असतानाही आमच्या कुटुंबातला एका आधारस्तंभ आणि प्रमुख ऐंन दिवाळी सणात देवाने नेला, तात्या तुमची आठवण आली तर डोळ्यांमध्ये अश्रूं उभे राहतात अहो, तात्या या परत तुमची आपलं कुटुंब वाट पाहत आहे..! मी जड अंतःकरणाने माझ्या कुटुंबाकडून आणि तुम्हां सर्वांकडून तात्यांना विनम्र अभिवादन करतो
