डाॅ. चित्रा नितीश मात्रे यांचे युजीसी नेट परीक्षेत दैदीप्यमान यश
अनुसूचित जाती प्रवर्गातून संपूर्ण देशात प्रथम क्रमांक
कल्याण/प्रतिनिधी ज्योत्स्ना करवाडे
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) वतीने राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) घेतलेल्या युजीसी नेट (जून 2025) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, कल्याण येथील रहिवासी डाॅ. चित्रा नितीश मात्रे यांनी 99.31 पर्सेंटाइल गुणांसह परीक्षेत उत्तीर्ण होत देशपातळीवर अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रथम क्रमांक, तर एकूण गुणवत्तेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
त्या मिलिंद महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर येथून “पाली आणि बुद्धिझम” या विषयात मे 2025 मध्ये एम.ए. ही पदव्युत्तर परीक्षा 84 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाल्या आहेत. पाली भाषेत त्यांनी नेट परीक्षा उत्तीर्ण करत असिस्टंट प्रोफेसर पदासाठी आणि पीएच.डी.साठी पात्रता मिळवली आहे.
कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत मिळवलेल्या या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाली भाषा आणि बुद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे कार्य त्या गेल्या काही वर्षांपासून करत आहेत.
आपल्या यशाचे श्रेय त्यांनी डाॅ. संघमित्रा जाधव मॅडम (कल्याण), डाॅ. प्रमोद इंगोले सर (पाली विभाग प्रमुख, मिलिंद महाविद्यालय), भन्ते डाॅ. यश काश्यपायन,भन्ते नीतेश वर्धन , डाॅ. किर्तीराज लोणारे सर, पुंडकर सर, पती नितीश सदाशिव मात्रे, मुलगा निशान, मुलगी सिद्धी व मातोश्री ललिता रामचंद्र वंजारी आणि कुटुंबीयांना दिले आहे.
डाॅ. चित्रा मात्रे यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
