अमळनेरात वाढीव दराने युरिया विक्री करून शेतकऱ्यांची लुट न थांबल्यास प्रहार जनशक्ती पक्षाचा यांच्या आंदोलनाचा इशारा….
जळगाव जिल्हा प्रतिनिधी: समाधान पाटील
अमळनेर तालुक्यात युरिया खताची
वाढीव दराने सर्रास विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप करत, याविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे रवींद्र पाटील यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
रवींद्र पाटील यांनी तालुका कृषी कार्यालय आणि पंचायत समिती कृषी विभागाला या संदर्भात निवेदन सादर केले असून, त्यात ठोस पुरावेही जोडले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील साईकृष्णा फर्टिलायझर या कृषी केंद्राने त्यांना युरियाची एक बॅग ३०० रुपये प्रति बॅग या वाढीव दराने विकली. या व्यवहाराची पक्की पावती, कच्ची पावती आणि ऑनलाइन केलेल्या पेमेंटचे स्क्रीनशॉट असे सर्व पुरावे त्यांनी सादर केले आहेत.
निवेदनात पाटील यांनी म्हटले आहे की, कृषी केंद्रांवर युरियाचा साठा उपलब्ध असूनही, तो नसल्याचे भासवून शेतकऱ्यांकडून अतिरिक्त दर आकारले जात आहेत. त्यांनी तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. पाटील यांच्या मते, ठाकरे शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष करत असून, मनमानी कारभार करणाऱ्या काही कृषी केंद्र चालकांना पाठीशी घालत आहेत.
जर ही शेतकऱ्यांची आर्थिक लूट त्वरित थांबवून संबंधित कृषी केंद्र चालकांवर कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने या निवेदनातून
