अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रेम संबंधातून विवाहित प्रेयसीचा खून, मृतदेह घाटात फेकला, प्रियकर स्वतःहून शिऊर पोलीस ठाण्यात हजर झाला..!!
कलावती गवळी ( छ. संभाजीनगर जिल्हा ) प्रतिनिधी
पैशाच्या मागणीवरून झालेल्या वादांतून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रियकरांने आपल्या विवाहित प्रेयसीचे दगडावर डोके आपटून खून केला व त्यानंतर तिचा मृतदेह दौलताबाद घाटात फेकला ही घटना गुरुवारी समोर आली आहे. त्यानंतर आरोपी प्रियकर सुनील खंडागळे हा स्वतःहून शिऊर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. खुनाची कबुली दिल्याने सर्व प्रकार उघडकीस आला. मृत विवाहित प्रेयसी दिपाली गणेश आस्वार कन्नड येथे आपल्या बहिणीकडे वास्तव्यास होती काही महिन्यांपासून तिचे मांडकी (ता. वैजापूर ) येथील सुनील सुरेश खंडागळे ( वय 19) या तरुणाशी दिपाली आस्वारचे प्रेमसंबंध जुळले होते. दिपाली चा वैजापूर तालुक्यांतील शंकर त्रिभुवनसोबत विवाह झाला होता. त्यांना एक-दोन वर्षाची मुलगीही आहे. काही महिन्यांपूर्वी तिचे सुनील सोबत प्रेमसंबंध जोडले होते. वर्षभरांपासून ती पतीपासून विभक्त होते. अब्दीमंडीतील आजीकडे ते राहत होती. दिपाली आणि सुनील मध्ये वाद सुरू झाले होते बुधवारी दिपाली कन्नड तालुक्यातील राहणाऱ्या बहिणीकडे गेली. सुनीलला कळताच गुरुवारी रात्री त्याने तिच्या बहिणीचे घर गाठले. तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून दौलताबादकडे निघाला मध्यरात्री अडीच वाजता दौलताबाद घाटात कठड्यावर बसून त्यांच्यात गप्पा झाल्या. पुन्हा वाद भडकून सुनीलने तिचे डोके कठड्यावर आपटत हत्या केली. (इंस्टाग्रामवर आनंदाचे स्टेटस ) सकाळी आंघोळ करून कपडे बदलून तो शिऊर पोलीस ठाण्यात हजर झाला. रात्री प्रेयसीचा खून करून आलोय, असे त्यांनी सांगताच पोलीसही हबकले. विशेष म्हणजे, हत्यानंतर सुनीलने इंस्टाग्रामवर आनंदी चेहऱ्याचे स्टेटस ठेवले होते. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव खणखंब यांनी तात्काळ दौलताबाद पोलीस ठाण्याला खबर दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला असता काही वेळातच तो आढळून आला नंतर ओळख पटवून मृतदेह विवाहित दिपाली गणेश आस्वार (वय 23) हिचाच असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर प्रियकर सुनीलवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
