न्यू हायस्कूल तळोदा येथील स्काऊट गाईड राज्य पुरस्काराने आठ विद्यार्थ्यांच्या गुणगौरव
कैलास शेंडे
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदुरबार: तळोदा येथील न्यू हायस्कूल संस्थेचे युवा नेतृत्व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रा.अमरदीप अरुणकुमार महाजन सर व प्रा.शितलताई महाजन मॅडम, मा.उपमुख्याध्यापक श्री एस सी खैरनार सर यांच्या अनमोल मार्गदर्शनाने यशस्वी विद्यार्थ्यांना नंदुरबार येथे भारत स्काऊट गाईड कार्यालय जिल्हा नंदुरबार यांच्या अंतर्गत राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांच्या गुणगौरव जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. याप्रसंगी नंदुरबार जिल्हाधिकारी मा.डॉ.मिताली सेठी मॅडम,उपशिक्षणाधिकारी सौ वंदना वळवी मॅडम, जिल्हा आयुक्त गाईड सौ रत्नाताई रघुवंशी, जिल्हा मुख्यालय आयुक्त गाईड वर्षाताई जाधव मॅडम, जिल्हा ट्रेनर हेमंत पाटील सर, सहाय्यक ट्रेनर नरेंद्र गुरव सर, हिरालाल पाटील सर, संकेत माळी सर, जिल्हा संघटक महेंद्र वसावे सर, जिल्हा संघटक गाईड संगीता रामटेके मॅडम, जेष्ठ लिपिक ज्ञानेश्वर सावंत उपस्थित होते. राज्य पुरस्कार परीक्षा उत्तीर्ण झाले म्हणून राज्यपालांच्या सही चे प्रमाणपत्र माननीय जिल्हाधिकारी डॉ.मिताली सेठी मॅडम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
भारत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे राज्यपालांच्या सहीचे प्रमाणपत्र व पदक देऊन गौरव करण्यात आला. त्यात रुद्र संकेत माळी,पृथ्वीराज भगवानसिंग राजपूत,पियुष दीपक पाटील,निखिल दीपक मराठे,जयेश जितेंद्र साटोटे,दर्शन किसन परदेशी, गौतम शांतीलाल लोहार,
मंथन गोपाल परदेशी
व उत्कृष्ट स्काऊट लीडर संकेत माळी सर यांचाही सत्कार करण्यात आला.
सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्राचार्य डॉ.ए ए महाजन सर,मा. उपमुख्याध्यापक एस सी खैरनार सर ,पर्यवेक्षक प्रा ए एल महाजन सर, पर्यवेक्षक ए आर सूर्यवंशी सर यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी केले.
