अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
आपला दवाखाना” घोटाळा प्रकरण — भीम आर्मीने फैजपूर प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन, SIT चौकशीची मागणी
फैजपूर, ता. २५ जुलै (प्रतिनिधी):
जळगाव जिल्ह्यातील हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि वर्धनी केंद्र शहरी आरोग्य योजना यामध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आज भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून एस.आय.टी. (विशेष तपास पथक) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
भीम आर्मीच्या प्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, १५व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून प्राप्त झालेला निधी जनतेच्या आरोग्यासाठी वापरण्याऐवजी अपहार करण्यात आला असून, यामागे डॉ. भायेकर यांची भूमिका संशयास्पद आहे. दिनांक १५ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्येही या घोटाळ्याचा सविस्तर तपशील उघड करण्यात आला होता. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, याकडे भीम आर्मीने प्रशासनाचे लक्ष वेधले.भीम आर्मीने स्पष्ट इशारा दिला की, जर १४ ऑगस्टपर्यंत कारवाई झाली नाही, तर १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत तीव्र आंदोलन करण्यात येईल. आणि या आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनप्रसंगी भीम आर्मीचे रावेर तालुका अध्यक्ष राहुल भाऊ निंभोरे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख राहुल जयकर, रावेर तालुका उपाध्यक्ष जुम्मा तडवी, जिल्हा संघटक हेमराज तायडे, संतोष तायडे, अविनाश लहासे व मुकद्दर तडवी, मोसिम तडवी आदी उपस्थित होते.
