अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
शासकीय वस्तीगृहात राहणाऱ्या महिला विद्यार्थिनी साठी महिला सुरक्षितता व आत्मसंरक्षण” या विषयावर राबवलेला कार्यक्रम
पो.ठाणे बेलतरोडी अंतर्गत शासकीय वस्तीगृह, खापरी येथे पोलीस दीदी कार्यक्रम संपन्न
आज दि.25.07.25 रोजी पोलीस ठाणे बेलतरोडी यांच्या वतीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, खापरी पुनर्वसन येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वस्तीगृहात “महिला सुरक्षितता व आत्मसंरक्षण” या विषयावर ‘पोलीस दीदी’ उपक्रमांतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थिनींच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः रोडरोमिओ, उपद्रवी प्रवृत्ती व महिलांवर शेरेबाजी करणाऱ्यांविरुद्ध त्वरित कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आले.
महत्वाचे मुद्दे:
परिसरात संपूर्ण CCTV प्रणाली कार्यान्वित असून नियमित मॉनिटरिंग केले जाते.
तीन शिफ्टमध्ये महिला गार्डची नियुक्ती आहे.
मुलींच्या ये-जा नोंदी नियमित घेतल्या जातात.
सायंकाळी ६ नंतर बाहेरच्या पुरुषांना प्रवेशबंदी आहे.
रात्रीच्या वेळेस इमर्जन्सी असल्यास विद्यार्थिनींना महिला गार्डसोबत मेडिकलसाठी पाठवण्याची व्यवस्था आहे.
मुली गावी जात असल्यास पालकांशी संपर्क करून फॉलोअप ठेवण्यात येतो.
कार्यक्रमात पोलीसांनी 112 आपत्कालीन सेवा, नियंत्रण कक्ष व पोलीस ठाण्याचे थेट संपर्क क्रमांक विद्यार्थिनी व वॉर्डन यांना प्रदान केले.
या प्रसंगी वस्तीगृहाच्या वॉर्डन श्रीमती क्षितिजा कदम मॅडम, प्राचार्या डॉ. बोरकर मॅडम, प्रा. सम्राट थोरात, प्रा. प्रशांत गव्हाणे आदी प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन त्यांचे अनुभव व समस्या जाणून घेतल्या. मुलींच्या मनात सुरक्षिततेविषयी आत्मविश्वास निर्माण व्हावा, हा मुख्य उद्देश यामागे होता.
पोलीस विभागामार्फत असे उपक्रम नियमित घेऊन महिला सुरक्षा व जनजागृतीला बळ दिले जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
—
💠 महिला सुरक्षेसाठी पोलीस विभाग सजग आणि कटिबद्ध आहे 💠
वपोनि. मुकुंद कवाडे, पो ठाणे बेलतरोडी.
