थेपडे म्हसावद विद्यालयात “एक पेड मॉ के नाम” कार्यक्रम उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
म्हसावद तालुका जळगाव येथील
स्वा.सै.पं.ध.थेपडे माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात आज दिनांक 24 जुलै 2025 रोजी “एक पेड माँ के नाम” हा हृदयस्पर्शी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला माता पालक,विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्याध्यापक श्री. जी. डी. बच्छाव सर यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. पी. डी. चौधरी सर यांनी भूषवले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचे महत्व विशद केले. तसेच प्रत्येकाच्या जीवनात मातृत्वाचे अनमोल स्थान यावर प्रकाशझोत टाकत माता ~मुलगा,माता ~मुलगी यांनी रोप लावून ते जगवावे असा मौलिक सल्ला दिला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पी. पी. मगरे सर यांनी केले. सदर प्रसंगी माता पालकांची लक्षणीय उपस्थिती होती. उपस्थित सर्व माता पालकांचे गुलाबपुष्प व एक रोप देऊन स्वागत करण्यात आले. सर्व 111 माता पालकांनी आपल्या पाल्यांसोबत रोप स्वीकारून आम्ही ते लावू व झाड मोठे होईपर्यंत त्याचे संगोपन करू असे आश्वासन आदरणीय मुख्याध्यापक श्री.पी.डी.चौधरी सर यांना दिले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आणि उपस्थितांच्या मनात घर करून गेला. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री के. पी .पाटील सर यांनी आभार मानले.
