अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
का,लक्ष्मण दादा सवाणे यांच्या प्रथम धम्म प्रवचन, पूज्य भंतेना चिवरदान कार्यक्रम संपन्न
फुले. शाहू. आंबेडकर चळवळीतील जेष्ठ अभ्यासक साहित्य का,लक्ष्मण दादा सवाणे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त ढोले पाटील रोड येथील नवयुग बॅकेट हॉल मध्ये उपदेश, धम्म प्रवचन, पूज्य भंतेना चिवरदानाचा कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी भंते नागघोष महाथेरो, भंते धम्मानंद, भंते पय्याररखीत, भंते सचित बोधी, भंते एस प्रियदर्शनी
यांनी आपल्या धम्मप्रवचनामध्ये दान देणे हे बौद्ध धम्मात वर्षावासामध्ये सर्वात श्रेष्ठ धम्म दानअसते असे धम्म प्रवचनामध्ये महत्त्व पटवून सांगितले,
यावेळी या कार्यक्रमाला पुण्याचे माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रपक्षाचे शहराध्यक्ष मा.प्रशांत जगताप, सौ.भारतीताई जयदेव गायकवाड, निलेश आल्हाट, दलित पॅंथर पुणे शहराध्यक्ष प्रकाश साळवे, डॉ निकिता गायकवाड, सनी मेमाने, रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, आझाद समाज पार्टीचे पुणे शहराध्यक्ष भीमराव कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर उपाध्यक्ष सचिन शिंदे, ऍड, महादेव सवाणे, गौतम सवाणे,भारत सवाणे, संतोष सवाणे, दादासाहेब वाबळे, प्रवीण कुलकर्णी, कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष आनंद सवाणे यांनी केले होते,
