सातारा तालुका पोलिसांकडून हरवलेले एकूण 11 लाख 40 हजार रुपये किंमतीचे ७६ मोबाईल हस्तगत..!!
सातारा तालुका पोलिसांची दमदार कामगिरी..!!
स्नेहल तांबोळी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी
सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांनी तालुका पोलिस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील, सध्या सातारा शहरांत बाजारपेठा महाविद्यालय गर्दीच्या ठिकाणाहून मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण शहरांत चांगलेच वाढले असून. आपल्यासारख्या सर्व सामान्यांसाठी पोलीस प्रशासन मात्र नेहमीच सज्ज असल्याचे दिसून येते. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नागरिकांचे गहाळ झालेल्या मोबाईलच्या तक्रारी दाखल होत्या.
त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी विभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांनी आपल्या पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या तपासी अधिकारी व पोलीस अंमलदारांना गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यास सूचना दिल्या होत्या. सातारा तालुका पोलिसांनी सीईआयआर पोर्टल व तांत्रिक आधारे महाराष्ट्रांत तसेच पर राज्यांतून वेगवेगळे जिल्ह्यातून वारंवार संपर्क करीत अगदी शिताफीने सदरची मोहीम राबविल्याने सातारा तालुका पोलिसांकडून अखेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांचे गहाळ झालेले एकूण 11 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 76 मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. सदरची मोहीम ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली आहे. सदर मोबाईल पैकी 33 मोबाईल गहाळ झालेल्या नागरिकांना परत करण्यात आले आहेत. तर उर्वरित 23 मोबाईल परत देण्याची प्रक्रिया चालू आहे. अशी माहिती तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांनी दिली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सीईआयआर पोर्टलचे कामकाज पाहणारे मपोकॉ. वर्षा देशमुख यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे पोलीस हवालदार राजू शिंखरे पोलीस हवलदार मनोज गायकवाड पोलीस हवालदार पंकज ढाणे पोलीस हवालदार दादा स्वामी पोलीस हवालदार विदया कुंभार पोलीस हवालदार प्रदीप मोहिते पोलीस हवालदार संदीप पांडव पोलीस हवालदार फणसे आदीं पोलिसांनी या मोहिमेत सहभाग घेतला. सातारा तालुका पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून विशेष कौतुक करीत अभिनंदन करण्यात आले आहे.
