कुडाळ तालूका भंडारी मंडळाचा – कुडाळ भंडारी समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीमान नामदार नितेशजी राणे साहेब व अ. भा. भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष श्री नविनचंद्र बांदिवडेकर उपस्थित.
कुडाळ, दिनांक : २०जुलै २०२५ रोजी कुडाळ तालूका भंडारी मंडळ.
कुडाळ भंडारी समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीमान नामदार नितेशजी राणे साहेब उपस्थित संपन्न झाला. उद्घाटन नंतर विद्यार्थ्यांना संबोधताना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट दर्जाचे ए आय शिक्षण व्यवस्था जिल्ह्यांमध्ये करण्याचे आश्वासन दिले.
त्याचप्रमाणे त्यांनी भंडारी समाजाचे जिल्हा भंडारी भवन बांधून देण्याचे आश्वासनही दिले.
वरील प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांचे मनसोक्त कौतुक केले
भंडारी समाज हा नेहमीच आमच्या पाठीशी उभा असतो, आणि भंडारी समाज एकदा वचन दिले की, ती पूर्तता करतो. त्यांनी कालिदास कोळबंकरांचे उदाहरण दिले.
राष्ट्रीय अध्यक्ष श्री नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी आपल्या मनोगतात श्रीमान भक्ती भूषण दानशूर भागोजी शेठ कीर यांचे जीवन गाथा थोडक्यात सांगितली त्याचप्रमाणे शूरवीर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांनी गाजवलेला पराक्रम व त्यांनी बांधलेला खांदेरीचा किल्ला बांधताना ब्रिटिशांचा आणि सिद्धीचा पराभव केला, याचे कथन केले. त्याचप्रमाणे जिल्ह्यात एआय सेंटर आणि आयएएस, आयपीएस साठी व्हर्च्युअल क्लासेस सुरू व्हायला हवे, अशी विनंती पालकमंत्री नितेश राणे यांना केली त्या त्याचप्रमाणे नॅशनल हायवे 66 मुंबई ते गोवा या रस्त्याचा नामांतरण दानशूर भक्तिभूषण भागेजी शेठ कीर यांच्या नावे व्हावं असं निवेदनपत्र मंत्री नितेश राणे यांना दिले. नामदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना आपण जिल्ह्याचे खासदार श्रीमान नारायण राणे यांच्यापर्यंत हा विषय नेतो कारण हा विषय केंद्र सरकारचा आहे उचित कारवाई करून पूर्ण प्रयत्न करीन. असे सांगितले.
या कार्यक्रमास अध्यक्ष. स्थान पालकमंत्री श्रीमान नितेश राणे यांनी स्वीकारले होते. प्रमुख पाहुणे राष्ट्रीय अध्यक्ष नवीनचंद्र बांदीवडेकर, जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीमान हेमंत करंगुटकर, कुडाळ तालुका अध्यक्ष अतुल बंगे, मायनाक भंडारींचे वंशज पांडुरंग मायनाक, माजी अध्यक्ष मामा मढीये, माजी अध्यक्ष एकनाथ टेमकर, राजू गवंडे, रत्नागिरी तालुका संघाचे अध्यक्ष राजीव जी कीर व इतर मान्यवर उपस्थित होते.
