अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
नागपूर मध्यवर्ती कारागृह,नागपूर
|| अमली पदार्थ व्यसन मुक्तीबाबत प्रबोधनात्मक व्याख्यान ||
दिनांक 19.07.2025
——————————————————————-
मा.श्री. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदयासाठी डॉ. भूषणकुमार उपाध्याय, माजी. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचा अमली पदार्थ व्यसन मुक्तीबाबत प्रबोधनात्मक व्याख्यान कार्यक्रम दिनांक 19.07.2025 रोजी आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यकमाचे प्रस्ताविक तथा कार्यक्रमाची सुरवात श्रीमती दिपा वै.आगे, अति.अधीक्षक यांनी डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांच्या सेवा कार्याचा अल्प परिचय देवून करण्यात आली.
डॉ.भूषणकुमार उपाध्याय साहेब यांनी व्याख्यान दरम्यान बंदयांना शारिरीक व मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपचार पध्दती त्यांचे प्रात्याक्षीक बंदयाकडून करवून घेतले त्यांच्या व्याख्यानामध्ये खालील बाबीचां समावेश करण्यात आला होता.
डॉ. उपाध्याय व्याख्यानातील महत्वाची भूमिका :- डॉ. उपाध्याय साहेबांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये फक्त सैद्धांतिक भाष्य न करता, प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून बंद्यांना विविध उपचारपद्धतींशी जोडले. यात योग, प्राणायाम, ध्यानधारणा, नैसर्गिक उपचार, आहारतत्व, आणि समुपदेशन (counselling) यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, हे उपक्रम बंदयांच्या सहभागातून तसेच बंदयांना त्यांना मनापासून स्वीकारले गेले, कारण ते “आज्ञेने” नव्हे तर “समजून” व “उमजून” डॉ.उपाध्याय साहेब यांनी करवून घेतले होते.
मन शांतीसाठी नियमीत मार्गदर्शन, नशामुक्ती व व्यसनमुक्तीसाठी शास्त्रीय उपाय, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रार्थना, ध्यानधारणा, भ्रामरी प्राणायाम, सकारात्मक विचारसरणी व आत्मपरीक्षण यासाठी मार्गदर्शन या प्रात्यक्षिक पद्धतीचा परिणाम बंदयांच्या बंद्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल तसेच आक्रमकतेमध्ये घट, संवादकौशल्यात वाढ तसेच बंदयांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता कमी होईल असे मत व्यक्त केले.
कारागृह अधीक्षक श्री. वैभव सु.आगे यांनी अध्यक्षीय भाषण तसेच अभार व्यक्त करतांना डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचे कार्य बंद्यांच्या मनामनात परिवर्तन घडवणारे होते. त्यांनी व्यवस्थेच्या चौकटीत राहून, ती चौकट अधिक मानवी बनवली. बंदीगृह म्हणजे फक्त शिक्षा नव्हे, तर परिवर्तनाची संधी हे त्यांनी गळाभेट सारखे उपक्रमाची सुरवात करून त्यांनी कृतीतून दाखवून दिले.
त्यांचे हे योगदान कारागृह व्यवस्थापनातील एक ‘मानवीकरणाचा’ आदर्श आहे. बंदयांमध्ये आत्मचिंतनाची प्रेरणा, आरोग्यप्रद जीवनशैलीची जाणीव आणि समाजात पुन्हा प्रतिष्ठित जीवन जगण्याची उमेद त्यांनी दिली – हे कार्य केवळ एक अधिकारी म्हणून नव्हे, तर एक समाजसुधारक म्हणून त्यांची ओळख ठरते. डॉ. भूषणकुमार उपाध्याय साहेब एक संवेदनशील, दूरदृष्टी असलेले प्रशासक होते, ज्यांनी कारागृह व्यवस्थापनात “मानवी मूल्यांचा” समावेश केला. त्यांच्या नेतृत्वाखाली, कारागृहातील बंदयांच्या केवळ सुरक्षा व्यवस्थेवर नव्हे, तर त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यावर विशेष भर देण्यात आला. असे मत श्री. आगे सर यांनी अभार व्यक्त करतांना मांडले.
सदर कार्यक्रमावेळी कारागृह अधीक्षक श्री.वैभव आगे, अति.अधीक्षक श्रीमती दिपा वै.आगे, उप अधीक्षक श्री. श्रीधर काळे, वरिष्ठ तुरूंगाधिकारी श्री.आनंद पानसरे, श्री.विजय हिवाळे, हवालदार श्री.संजय गायकवाड, शिपाई श्री. पंकज बुराडकर, यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारागृह शिक्षक श्री.लक्ष्मण साळवे यांनी केले तसेच कारागृह अधीक्षक श्री.वैभव आगे, यांनी कार्यक्रम यशस्वी करणारे सर्व अधिकारी/कर्मचारी व बंदीचे आभार मानले.
