प्रतिनिधी – किशोर रमाकांत गुडेकर, मुंबई विभाग प्रतिनिधी प्रमुख
सिने सृष्टीतल्या कलाकारांचा आक्रोश — शासनाच्या दुर्लक्षाविरोधात आमरण उपोषणाला सुरुवात
मुंबई, १५ जुलै २०२५ —
सिने सृष्टीत काम करणाऱ्या कलावंतांचा आणि तंत्रज्ञांचा आक्रोश आता रस्त्यावर उतरला आहे. ‘सिने सृष्टी फिल्मी कलाकार’ संघटनेच्यावतीने सरकारकडून कामगारांच्या फसव्या आश्वासनांचा निषेध करत आजपासून (१५ जुलै) आझाद मैदानात बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले.
“शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करा” अशी जोरदार मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनस्थळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. अनेक ज्येष्ठ कलाकार, कामगार, महिला सदस्य आणि तंत्रज्ञ या उपोषणात सहभागी झाले असून शासनाकडून ठोस निर्णय येईपर्यंत लढा थांबणार नसल्याचा इशाराही दिला आहे.
संघटनेने सरकारकडून वारंवार दुर्लक्ष, अनियमित कामाचे धोरण आणि रोजगाराच्या अस्थिरतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. कलाकारांच्या न्याय मागण्यांसाठी सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हावे, अशी भावना उपस्थितांमधून व्यक्त झाली.
