अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर वाढत असलेल्या कृत्रिम फुलांच्या वापरामुळे पारंपरिक फुलउत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रोवर फ्लॉवर कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या वतीने राज्यभरातील फुलउत्पादक शेतकऱ्यांचा एकत्रित आणि संघटित मोर्चा मुंबईला आझाद मैदानात मुंबई येथे काढण्यात आला.
खेड-आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी काळे यांनी यापूर्वी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. त्यांनी समक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या लढ्याला ठाम पाठिंबा दिला आणि कृत्रिम फुलांविरोधातील त्यांच्या संघर्षात एकजूट दर्शवली.
यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापरामुळे शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांचा ठोसपणे उल्लेख करत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी आमदार सुनील शेळके, आमदार महेश शिंदे, आमदार शंकर मांडेकर यांच्यासह खेड तालुक्यातील फुल उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
