अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
आज दिनांक १७.०७.२०२५ रोजी अन्न व औषध प्रशासन, नागपूर चे अन्न सुरक्षा अधिकारी श्री. राजेश यादव, श्री. ललित सोयाम व श्री. रावसाहेब वाकडे यांच्या पथकाने मे. दुर्गे किराणा स्टोअर्स, मेन रोड, पवनी, ता. रामटेक, जि. नागपूर या किराणा दुकानावर धाड टाकून तपासणी केली असता सदर दुकानाचे मालक श्री. क्षितीज महेश ग्रोवर यांच्या ताब्यातून विविध ब्रँड चे सुगन्धीत तंबाखू चा एकूण १७.६ किलो व एकुण कि. रू.१८,०००/- किमतीचा साठा जप्त केला. आरोपीने मा. अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, (म.रा.), मुंबई यांचे प्रतिबंध आदेश क. असुमाअ/अधिसुचना-५८१/७, दि.१२/०७/२४ चे उल्लघंन केल्यामुळे त्यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ व त्याखालील नियम व नियमन २०११ चे कलम २६ (१), 2xi(2)(iv) 20(3)(e) 30(2)(a) कलम 3(9)(zz)(iv) शिक्षापात्र कलम ५९ नुसार गुन्हा केलेला आहे. तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, व २२३ अन्वये पोलिस स्टेशन, देवलापार येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
