डोंबिवलीतील वैश्य समाजाची पावसाळी वर्षा सहल
प्रतिनिधी गणेश तळेकर
डोंबिवली, ता. १५ डोंबिवली येथील वैश्य समाजाने वज्रेश्वरी-गणेशपुरी येथे पावसाळी वर्षा सहलीचे नुकतेच आयोजन केले. या सहलीला वैश्य समाजातील ज्ञाती-बांधवांनी उत्स्फूर्त
प्रतिसाद दिला.
गणेशपुरी येथील गौराई फार्मा येथे एकदिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
डोंबिवलीतील वैश्य समाजाचे विद्यमान विश्वस्त गोविंद म्हाडगुत यांनी नारळ वाढवून बसला हिरवा कंदिल दाखविला. त्यानंतर गप्पा-गाण्यांची मैफल चांगलीच रंगली. धमाल आणि् मौजमस्ती करीत ही वर्षा सहल पार पडली. संस्थेचे अध्यक्ष अशोक हेगिष्टे, त्याचबरोबर विवेक हेगिष्टे, समीर गांगण, भानुप्रताप नारकर आणि विलास कोलते आदी मंडळींनी हा सहल यशस्वी करणयात मोलाचा वाटा उचलला. श्रद्धा कामेरकर तसेच राजश्री जठार यांनीदेखील चांगलाच हातभार लावला.
नेहा नारकर म्हणाल्या, आम्हाला मस्त मजा आली.आपली काम सांभाळून हे काम करणं सोपं नसतं. त्यात प्रवासात सगळ्यांची काळजी घेणं हेही मोठं काम असतं. त्यामुळे नियोजन करणाऱ्यांचे मनापासून कौतुक आणि आभार.
वैशाली भाकरे म्हणाल्या, की सहल खूप छान झाली. आम्हा सगळ्यांना मजा आली. एक दिवस का असेना यानिमित्ताने सगळ्यांना एकत्र यायला मिळाल. नव्याने ओळखी झाल्या. या वेळेला आमचे गाववाले नातलग कोल्हापूरकर सगळ्या आल्या होत्या. खूप छान नियोजन होतं.
