अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
अमली पदार्थ निषेध दिनानिमित्त सेंट अँन्ड्रय़ूज शाळेतील विद्यार्थिनींनी व्यसनाधीनतेऐवजी शिक्षणाची कास धरावी असे म्हणत प्रचारफेरी काढून जनजागृती केली,
अमली पदार्थ निषेध दिनानिमित्त पुणे कॅम्प येथील सेंट अँन्ड्रय़ूज मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनींनी हातात फलक घेऊन प्रचार फेरी काढून जनजागृती केली, यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना साठे, शाळेच्या शिक्षिका मारिया देठे, शिमला कांबळे, शिल्पा यादव, अपर्णा शिंदे, मीनल पवार, आदि यावेळी उपस्थित होते,
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना साठे म्हणाले व्यसनाधीनतेऐवजी शिक्षणाची कास धरावी, व्यसनामुळे व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होते कुटुंबांची वाताहत होते अमली पदार्थांचे सेवन केवळ शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडवत नाही तर व्यसनाधीनतेतून गुन्हेगारीकडे वाटचाल होण्याची शक्यता वाढते त्यामुळे अमली पदार्थांच्या व्यसनापासून सर्वांनीच दूर राहा असे मनोगत व्यक्त केले,
