एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

नागपूर जिल्ह्यात पुरातील 138 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

 

नागपूर जिल्ह्यात पुरातील 138 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

प्रतिनिधी सतिष कडू नागपूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूरप्रवण भागात प्रशासन सतर्क

गावपातळीपर्यंत महसूल यंत्रणा सतर्क

उप्पलवाडी येथील 18 वर्षे वयाच्या व्यक्तीचा नाल्याचा प्रवाहात वाहून मृत्यू, एका व्यक्तीचा शोध सुरु

11 जनावरे मृत, 2 जखमी

सुमारे 453 घरांचे अंशत: तर 4 घरांचे पूर्णत: नुकसान

 

नागपूर, दि.9 : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. 8 जुलै रोजी जिल्ह्यात सरासरी 140 मिलिमिटर पाऊस झाला. उमरेड आणि कुही तालुक्यात 200 पेक्षा जास्त मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहरातही 100 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 138 हून अधिक लोकांना पावसाच्या वेढ्यातून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. उप्पलवाडी येथील 18 वर्षे वयाचा कार्तिक शिवशंकर लाडपे या युवकाचा नाल्याचा प्रवाहात वाहून मृत्यू झाला असून कळमेश्वर तालुक्यातील मौजे बोरगाव येथील अनिल हनुमान पानपत्ते या 35 वर्षे व्यक्ती नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला असून त्याचा शोध सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे कामठी, नागपूर, नरखेड, सावनेर, रामटेक, पारशिवनी, भिवापूर, उमरेड, कुही तालुक्यातील सद्यस्थितीत एकूण 11 जनावरे मृत, 2 जखमी, सुमारे 453 घरांचे अंशत: तर 4 घरांचे पूर्णत: नुकसान झाले. सर्व यंत्रणा दक्ष असून परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी गरज नसतांना घराबाहेर न पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

बचाव केलेले 138 नागरीक हे कामठी, नागपूर ग्रामीण, नागपूर शहर व कुही तालुक्यातील आहेत. यात कामठी तालुक्यातील पांढुर्णा येथील 8 व्यक्तींचे स्थानिक बचाव पथकाकडून स्थलांतरण करण्यात आले. पावनगाव येथील 35, पोवरी येथील 2 आणि परसोडी येथील 17 व्यक्तींचा बचाव एसडीआरएफ पथकामार्फत करण्यात आला. बचाव केलेल्या सर्व नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत तात्पुरता निवारा देण्यात आला आहे. नागपूर ग्रामीण तालुक्यातील हुडकेश्वर नगर येथील 9, विहिरगाव 10, नरसाळा 28 व्यक्तींना मिहान व मनपा अग्निशमन दलाच्या पथकामार्फत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. नागपूर शहर तालुक्यामधील कळमना- एकता नगर, पारडी या गावातील 18 व्यक्ती, भरतवाडा नवकन्या नगर येथील 7 नागरिकांची मनपाच्या अग्निशमन पथकामार्फत बचाव कार्य करुन त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. कुही तालुक्यातील टेकेपार गावातील 4 नागरिकांचा एनडीआरएफ यांच्या मदतीने बचाव करण्यात आला.

नागपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे स्थानिक नदी / नाले यांना पुर येवून शहरी तसेच ग्रामीण भागातील 23 पुलावरून पाणी ओव्हरफ्लो झाले. काही तासांकरिता काही गावांचा संपर्क तुटला. आलेल्या पुरामध्ये काही नागरीक अडकले असता त्यांना स्थानिक तसेच SDRF व NDRF पथकाच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. नागपूर ग्रामीण तालुक्यात 246 घरांमध्ये पाणी शिरले. जिल्हा प्रशासनाचे सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी फिल्डवर कार्यरत आहेत. दुपारपर्यंत जिल्ह्यातील 76 मंडळामध्ये 100 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आवश्यक सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. गरज भासल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) तसेच सैन्यदलाच्या मदत घेण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केल्या असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन
गरज नसल्यास विनाकारण नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेता पाऊस वाढण्याची शक्यता लक्षात घेता सर्व ती खबरदारी घेण्यात येत आहे. नरसाळा हुडकेश्वर येथील एक इसम पाण्यात वाहून गेला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link