लोकनेता बालाघाटाचा डॉ. बाबुरावजी जोगदंड साहेब
(चौसाळा प्रतिनिधी ) विवेक कूचेकर
एका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा अचानक सामाजिक राजकीय क्षेत्राचा भाग होऊन उत्तुंग गरुड भरारी घेतो आणि बघता बघता आकाशाला ही गवसणी घालतो आहे असे सर्वांचे कैवारी आणि बालाघाटाचे तारणहार आणि जनसामान्यांचे डॉ. बाबुरावजी जोगदंड साहेब श्रीमंती ही पैशाची असता कामा नये ती मनाची आणि विचारांची असावी हे ध्येय घेऊन जनकल्याणाचा मार्ग शोधणारे असंख्य कार्यकर्त्यांचे सेनापती सैन्य हे पोटावर चालते तरच युद्ध जिंकू शकतात तसेच कार्यकर्ता जर पोटाने तृप्त असेल तरच तो समाधानी दिसून खांद्याला खांदा लावून लढेल या विचाराने प्रेरित झालेले डॉ.बाबुरावजी जोगदंड साहेब यांनी असंख्य कार्यकर्त्यांना नोकरी व्यवसाय देऊन सक्षम बलवान बनविले म्हणून त्यांचा उल्लेख कार्यकर्त्यांचा सेनापती केला तर कुठे ते वावगे ठरणार नाही अठरापगड जातीच्या बीड विधानसभा मतदारसंघातील असंख्य लोकांना संघटित करून डॉ.साहेबांनी कार्यकर्त्यांची एक बलाढ्य फलटण बनविली त्यांच्या अडीअडचणीला धावत जाऊन त्यांना गोंजारले बीड विधानसभा मतदारसंघातील बालाघाटावर एकमेव संकटात धावून येणारा नेता म्हणजे डॉ. साहेब जेव्हा सर्व उपाय संपतात तेव्हा डॉ. बाबुरावजी जोगदंड साहेबांचा दरवाजा सर्वांसाठी आधार होऊन उभा असतो भुकेल्याला अन्न देणे, वस्त्रहीन माणसाला कपडे देणे, विद्यार्थ्यांना पुस्तके वह्या देणे, गोरगरीब विद्यार्थ्यांचे प्रवेश फीस देणे, गोरगरीब लोकांना हाताला काम देणे, पोटाला पोटभर अन्न देणे हा परोपकार डॉ. साहेबांचा त्याचा कुठेही कधीही उल्लेख ही नाही आणि गर्वही नाही जनता हीच माझी संपत्ती हा ज्याने विचार केला ते एकच बालाघाटावरील चौसाळा सर्कल मधील देवी बाभळगाव येथील भूमिपुत्र श्री डॉ. बाबुराव जोगदंड साहेब हे सण,उत्सव, महापुरुषांच्या जयंती, मंदिरे,बुद्ध विहार यासाठी सडळ हस्ते दान पारमिता निभावणारा दानशुर कर्ण, शासनाचा निधी उपलब्ध होत नाही म्हणून हाताश न होता स्वतःच्या पैशाने रस्ते, पायवाटा, इमारतीची रंगरंगोटी करून देणारा एक मसीहा, सामान्य लोकांचा शहेनशहा, आहेत का बोलण्यासारखे टीका करण्यासाठी काही शब्द, स्वच्छ मनाचा जे पोटात तेच ओठाने बोलणारे डॉ. साहेब मनात कपट न ठेवता, दुश्मनालाही घास भरवणारा अवलिया!
