वाघोली पोलीस स्टेशन, पुणे शहर
अट्टल सोनसाखळी चोरी करणारा आरोपी वाघोली पोलिसांच्या ताब्यात
संपादक: संतोष लांडे
वाघोली :दि.०६एप्रिल २०२५ रोजी मौजेकेसनंद थेऊर रोड, पाटील वस्ती ता. हवेली जि. पुणे येथुन फिर्यादी वांचे गणेश किराणा स्टोअर नावाच्या दुकानात दोन आनोळखी इसम मोटारसायकलवर येवुन त्यातील एक जण हॉटेल मधील काऊंटरजवळ आला व बिस्किट, चॉकलेट मागण्याचा बहाण्याने फिर्यादी यांचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावुन चोरी करून घेवुन गेले होते. त्याबाबत वाघोली पोलीस स्टेशन गु.रजि.नं.११५/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर दाखल गुन्ह्याचा तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पो-स्टे पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस स्टेशनकडील तपास अधिकारी पोलीस उप-निरीक्षक वैजिनाथ केदार, पोलीस अंमलदार महादेव कुंभार, संतोष शेरखाने, मारुती वाघमारे, अमोल सरतापे, गहिणीनाथ बोयणे यांनी तसेच पोलीस अंमलदार विशाल गायकवाड यांचे तांत्रिक विश्लेषण द्वारे दाखल गुन्ह्यातील आरोपी नाव मारुती ऊर्फ गोविंद रामनाथ आंधळे वय ३८ वर्षे रा.मु. लिंबोडी पोस्ट. देवीनिमगाव ता. आष्टी जि. बीड यास दाखल गुन्ह्यामध्ये अटक करुन आरोपीकडुन सोन्याचे मिनी गंठण १,००,०००/-रु किं. चे जप्त करण्यात आले आहे.
सदरची कामगीरी ना.पोलीस उप आयुक्त परी ४, पुणे शहर श्री. सोनय मुंडे, मा. सहा.पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस ठाणे श्री. युवराज हांडे, पोउपनिरी वैजीनाथ केदार, पोलीस अंमलदार महादेव कुंभार, विशाल गायकवाड, अमोल सरतापे, संतोष शेरखाने, गहिणीनाथ बोवणे, मारुती वाघमारे यांनी केली आहे
