अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन, २४ तासात गुन्हा उघडकीस करून आरोपीस केली अटक
प्रतिनिधी:गोपाळ भालेराव
चंदननगर (पुणे ):चंदननगर पोलीस स्टेशन गु. र. नं. २१३/२०२५, भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) या गुन्हयातील फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी नाव निर्भया वय १३ वर्षे ०८ महिने हिस दिनांक ०५जुलै २०२५ रोजी राहत्या घरापासुन कोणीतरी फिर्यादी यांच्या मुलीस फुस लावुन पळवुन घेऊन गेल्या बाबत दिलेल्या तक्रारी वरुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचा तपास पोलीस उप-निरीक्षक सचिन राऊत, चंदननगर पो.स्टे. पुणे यांच्याकडे देण्यात आला होता.
सदर गुन्हयातील पिडीत मुलगी व आरोपी यांचा शोध घेण्या करीता सी.सी.टी.व्हि. फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या अधारे तपास केला असता अपहरण झालेली मुलगी व तीला पळवुन घेऊन जाणारा आरोपी हे अहिल्यानगर भागात असल्याचे निष्पन्न झाल्याने, सदर ठिकाणी तात्काळ तपासकामी पोलीस उप-निरीक्षक सचिन राऊत व म. पोलीस अंमलदार देवकाते यांना पाठविले असता त्यांनी यातील पिडील मुलगी व तीला पळवुन घेऊन जाणारा आरोपी नाव, अभिषेक विजय जाधव वय २२ वर्षे रा. लेन नं-३, गणेश नगर वडगांवशेरी पुणे (मुळ गाव पाथर्डी जि. अहिल्यानगर) यांना अहिल्यानगर येथुन ताब्यात घेऊन, आरोपीस अटक करण्यात आलेली असुन त्यास आज दि.०६जुलै २०२५ रोजी मा. न्यायालयामध्ये हजर ठेवण्यात आलेले आहे. दाखल गुन्हा घडल्या पासुन २४ तासाच्या आत आरोपीस अटक करुन, पिडीत मुलीची सुखरुप सुटका करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप-आयुक्त, परि ४ पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पो.स्टे. पुणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सीमा ढाकणे, तपासी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक सचिन राऊत, म.पोलीस अंमलदार देवकाते यांनी केली आहे.
