आषाढी एकादशीनिमित्त मेहकर विधानसभा मतदार संघाचे दमदार लाडके माजी आमदार डॉ संजय रायमूलकर यांच्या राहत्या घरी भजनसंध्येचे आयोजन.
प्रतिनिधी- सारंग महाजन.
मेहकर विधानसभा मतदार संघ म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला.या मतदार संघाचे माजी आमदार डॉ संजय रायमूलकर साहेब यांच्या राहत्या घरी आषाढी निमित्त भजनसंध्या आयोजित केली होती.
विवेकानंद नगर येथील सुप्रसिद्ध शाहीर सज्जनसिंह राजपूत,साखरखेर्डा येथील सुप्रसिद्ध गायक शशिकांत बेंदाडे,सुप्रसिद्ध तबला वादक संजय म्हस्के,गायक थोरवे गुरुजी,महाराष्ट्राचे युवाशिवशाहीर झी युवा स्टार प्रवाह फेम विक्रांतसिंह राजपूत,ज्ञानेश्वर तुपकर,कार्तिक लाकडे ,काटे महाराज ,पडघान महाराज यांनी या घरघुती कार्यक्रमाला रंगत आणली.
कार्यक्रमासाठी आदरणीय संजय भारती सर,आदरणीय शिवदास सांबपुरे सर, आदरणीय प्रमोद रायमूलकर सर व परिसरातील अन्य भाविक उपस्थित होते.
डॉ रायमूलकर साहेबांनी शाल श्रीफळ वं भेटवस्तू देऊन सर्वांचा यथोचित सत्कार केला.
