दहा लाख वारकऱ्यांसाठी दहा हजार पोलीस तैनात, चेंगराचेंगरीचा प्रश्नच नाही
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी
सौ. कलावती गवळी (सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी
आषाढ शुद्ध एकादशी ( 6 जुलै) रोजी आहे, या आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरांत श्री. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखों भाविंक येतात तरी या कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा चांगलीच सज्ज झाली आहे, यामध्ये एक पोलीस अधीक्षक चार अप्पर पोलीस अधीक्षक 24 पोलीस उपअधीक्षक 76 पोलीस निरीक्षक ३१२ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक 4 हजार 850 पोलिस अंमलदार व 2 बीडीएस पथके आरपीसी दोन पथके क्यूआरटी चार पथके आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षित 14 कार्ट पथके नियुक्त करण्यात आलीय आहेत. तसेच जलप्रवासी वाहतुकीवर नियंत्रण राहण्यासाठी जलसंपदा विभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीने दहा ठिकाणी पथके स्थापन करण्यात आली आहेत. आषाढी यात्रेत एकाच ठिकाणी गर्दी होऊन चेंगराचेंगरी सारख्या घटना घडू नये यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी चांगलीच काळजी घेतली आहे, गर्दी कंट्रोल साठी पंढरपुरांतील महत्त्वांच्या 14 ठिकाणी विशेष पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे प्रत्येक ठिकाणी 25 वरिष्ठ पोलीस अधिकारी कंट्रोल मॅनेजमेंट चे काम पाहणार आहेत. पंढरपुरांत पार पाडत असलेल्या वारीत अंदाजे 20 ते 25 लाखांहून अधिक भाविक येतील असा अंदाज गृहीत धरून सोलापूर ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे
