एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मुलांनी विदवाण न बनता विध्यावान बनले पाहिजे सौ अनिता रा.गभाले

मुलांनी विदवाण न बनता विध्यावान बनले पाहिजे सौ अनिता रा.गभाले

कबनुर कोल्हापूर प्रतिनिधी : पापालाल सनाडी

 

अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गोष्टींसोबतच शिक्षण ही सुद्धा मूलभूत गरज बनली आहे. दैनंदिन जीवनातील सर्व गोष्टी योग्यरीत्या आत्मसात करण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे आहे शिक्षण न घेता विदवाण बनणाऱ्यांची संख्या फार मोठी होत आहे ,त्यामुळे त्याचा दृश्य परिणाम समाजाला भोगावा लागत आहे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे काळाची गरज बनली आहे, या करिता मुलांनी आत्ता पासूनच योग्य शिक्षण घेऊन विद्वान बनले पाहिजे असे मत थोर विचारवंत व यशस्वी उद्योजिका सौ.अनिता रा.गभाले यांनी सहारा फाउंडेशनच्या वतीने इयत्ता दहावी ,बारावी व उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनींच्या प्रेरणा सन्मान गौरव कार्यक्रमात बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की जीवनामध्ये शिक्षण एक महत्त्वाचा घटक असून या माध्यमातून काय योग्य, काय अयोग्य हे समजले जाते तसेच समाजामध्ये प्रतिष्ठा मानसन्मान मिळतो ह्यासाठी शिक्षण हे महत्वाचे आहे

,कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी देशभक्त रत्नप्पा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील हे होते. ते आपल्या भाषणामध्ये म्हणाले की आजच्या पिढीने शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे शिक्षण ही मूलभूत गरज बनली आहे शिक्षण योग्य असेल तर आपण जीवनात योग्य प्रकारे जगू शकतो व इतरांना चांगल्या पद्धतीने जगण्याचे मार्गदर्शन करू शकतो तसेच सहारा फाउंडेशन गेली पंधरा वर्षे सातत्याने सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शालेय मार्गदर्शन तसेच त्यांना लागणाऱ्या शालेय वस्तू देऊन त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारली जाते हे कौतुकास्पद आहे असे ही पी एम पाटील म्हणाले,
महाराष्ट्र शासनाचे लाडकी बहीण योजना हातकनंगले तालुक्याचे अध्यक्ष अविनाश बनगे यांनी सामाजिक व इतर सर्व क्षेत्रामध्ये काम करीत असताना सातत्य ठेवून सहारा फौंडेशन सामाजिक बांधिलकी जोपासत आहे त्यांचे कार्य हे शासकीय दरबारी नोंद घेण्यासारखे आहे. येणाच्या काळामध्ये शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगार मेळावा घेऊन रिकाम्या हाताला काम देणेची ग्वाहीही त्यांनी दिली,यावेळी मा, सभापती सौ.रेश्मा सनदी, माजी सरपंच मधुकर मनेरे,उपसरपंच सुधीर लीगाडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास कबनूर ग्रामपंचायत सदस्य सौ वैशाली कदम, सदस्य समीर जमादार,सौ,शकिला मुजावर ,सौ,शबाना शेख,नसरुद्दीन सनदी, प्रकाश केणी ,सतीश चव्हाण ,गौस बागशाही,राजू मुजावर, आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक सहारा फौंडेशन चे संस्थापक श्री पापालाल सनदी सूत्रसंचलन उमेश जाधव, व आभार विजय देसाई यांनी मानले.
चौकट : शालेय विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करताना भावनिक झालेने इतर अनेक पालकाना देखील रडू आवरले नाही त्यावेळी संपुर्ण कार्यालयात अनेक मिनिटे भावनिक वातावरण पसरले होते,

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link