जन सुनावणीच्या माध्यमांतून पीडित महिलांचा आनंद द्विगुणित
विजया रहाटकर राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षांच्या उपस्थितीत महिला जनसुनावणी
कलावती गवळी (पुणे जिल्हा ) प्रतिनिधी
राष्ट्रीय महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे जलद आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी महिला जन सुनावणीचे आयोजन करण्यात येत असून. पीडित महिलांना न्याय मिळवून देत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित करण्याचे काम करण्यात येत असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा अध्यक्ष विजय रहाटकर यांनी सांगितले सुनावणीत आयोगाकडे एकूण 35 प्राप्त तक्रारी तसेच ऐनवेळी आलेल्या 21 तक्रारींची दखल घेऊन कारवाई करण्यात आली. त्यातील 20 तक्रारींबाबत तत्काळ निर्णय देण्यात आला. तर उर्वरित प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देवुन त्वरित तक्रारींची दखल घेण्याचे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरांनी दिले आहेत. रहाटकर म्हणाल्या राष्ट्रीय महिला आयोगाकडे देशभरांतून महिलांच्या तक्रारी नेहमीच प्राप्त होत असतात. त्यांना दिल्ली येथे येथील आयोगाच्या कार्यालयात येण्यास-जाण्यास अडचणीचा विचार करता राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी, या उपक्रमांतून काम करत असतं. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आयोजित महिला जनसुनावणी प्रसंगी विजया रहाटकर बोलत होत्या. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख,निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी व पीडित महिला उपस्थित होत्या,
