जेजुरी ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य रथाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन व 308 रुग्णांची तपासणी
प्रतिनिधी सारंग महाजन
जेजुरी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आषाढी वारी निमित्त वारकऱ्यांसाठी कर्करोग निदान व जागरूकतेसाठी मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन करून आरोग्य रथाच्या माध्यमातून ३०८ रुग्णांची तपासणी करण्यात आली .आरोग्य रथाचे उद्घाटन श्री मार्तंड देवस्थानाचे विश्वस्त डॉ .राजेंद्र खेडेकर व जेजुरी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ .प्रताप साळवे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सर्व आरोग्य सेवक उपस्थित होते. आरोग्य रथाच्या माध्यमातून 116 रुग्णांची मुखांचा कर्करोग तपासणी, 96 महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाची तपासणी ,96 महिलांच्या गर्भाशयाच्या मुखांची तपासणी असे एकूण 308 वारकरी रुग्णांची तपासणी करण्यात आली. मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने जेजुरी गडकोट परिसरामध्ये दारू किंवा तंबाखूजन्य पदार्थ तसेच गुटखा यांना बंदी केलेली आहे. तंबाखूजन्य पदार्थ हद्दपार करणे म्हणजे कर्करोगमुक्तीकडे मोठे पाऊल टाकण्यासारखे आहे असे मत उद्घाटन प्रसंगी डॉ राजेंद्र खेडेकर यांनी व्यक्त केले.
