अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संपादक संतोष लांडे
पुणे पोलीस आयुक्तालयातील आंबेगाव पोलीस स्टेशन ठरले ISO 9001:2015 मानांकित, आयुक्तालयातील पहिलेच पोलीस ठाणे.
आज रोजी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमितेश कुमार यांच्या हस्ते आंबेगाव पोलीस स्टेशनला मिळालेले ISO 9001:2015 प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमाने आंबेगाव पोलीस स्टेशनला ISO 9001:2015 चे प्रमाणपत्र मिळाले आहे. यामुळे आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये अभिलेख नोंदवण्याकरीता असणारी सर्व रजिस्टरे, फाईल्स अद्यावत असून कामकाजामध्ये सुसूत्रता निर्माण झाली आहे व नागरिकांना दर्जेदार व उत्तम पोलीस सेवा मिळत आहे. ISO 9001:2015 प्रमाणपत्रामुळे पोलिसांना कामात स्फूर्ती तसेच प्रेरणा मिळत आहे व पोलीसांच्या कामाचा ताण कमी झाला आहे. ISO 9001:2015 प्रमाणपत्र हे आंबेगाव पोलीस स्टेशनच्या जनसेवेच्या वचनबद्धतेचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
ISO 9001:2015 प्रमाणपत्र प्रदान सोहळ्यास मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संजय बनसोडे, अपर पोलीस आयुक्त, पचिम प्रादेशिक विभाग, मा. श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २ पुणे शहर, मा. श्री. राहुल आवारे, सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर, मा. श्री. शरद झिने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आंबेगाव पोलीस स्टेशन, मा. श्री गजानन चोरमले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) व आंबेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी हजर होते.
मा. सविनय सादर
